Wednesday, August 11, 2010

ओझर्ड्याचा अजस्र धबधबा

कोयनानगरहून 'नवजा'ला जाताना कोयनानगरपासून ९ किमी अंतरावर ओझर्ड्याचा मोठा धबधबा आहे.
१ ऑगस्टला इथे गेलो होतो.

इथे जाताना अजून दोन मोठ्ठे धबधबे लागतात. पण यांच्या मोहात फार न पडलेलंच बरे... कारण खरे आकर्षण तर पुढे आहे.

(धबधबा क्र. १)





(धबधबा क्र. 2)



उजव्या बाजूला पसरलेला 'शिवाजी सागर'...



वळणावळणाचा रस्ता मागे टाकत आपण मुख्य धबधब्याला पोचतो. याला 'पंचधारा' असेही म्हणतात. का ते खालच्या फोटोवरून समजेल. :)




धबधब्याच्या डाव्याबाजूने एक वाट जाते, ती थेट त्याच्या तळाशी, जिथे वरून जोरदार पाणी पडत असते तिथे घेउन जाते.



वाटेवरून दिसणरे फेसाळते पाणी



पंधरा-वीस मिनीटे चालल्यावर आपण धबधब्याच्या तळाशी पोचतो. इथं पोचल्यावर जे काही वाटते त्याचे काय वर्णन करावे...पूर्ण वेळ धबधब्याचे पाणी वरून पडत असते, तुषार तर इतके असतात की वरून पडणारे पाणी पाहाताना डोळे उघडेच राहात नाहीत.






कितीही काळजी घेतली तरी सोबत आणलेले सगळे काही इथे भिजते... तेव्हा काळजी सोडावी आणि मनसोक्त भिजावे. :)



2 comments:

  1. Hey bro amazing pictures ya...u never invite me for such wonderful trips man....!!!! :-(

    ReplyDelete
  2. hi mitra,

    vry nice scenes n nice photography

    ReplyDelete